मुंबई : ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता राज्य परिवहन कार्यालय ठाणे मोटर वाहन निरीक्षक सौ झिने ह्यांच्या प्रयत्नातून व पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रस्ता सुरक्षा विषयावर माहितीपर सत्र व हेल्मेट चे वाटप ठेवण्यात आले होते सदर कार्यक्रम साईनाथ नगर काजूवाडी येथे घेण्यात आला कार्यक्रमात पालवी संस्थेच्या अध्यक्ष डॉ समीरा समीर भारती ह्यानी प्रस्ताविक केले मोटार वाहन निरीक्षक जयश्री झिने, शिवाली सोमवंशी,मोटार वाहन उपनिरीक्षक स्नेहल चौधरी, अवधूत पाटील ह्यांनी महिलांना रस्ता सुरक्षितता विषयी मार्गदर्शन केले व उपस्थित महिलांशी संवाद देखील केला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली
हेल्मेट वापर,गाडी चालवित असतानाचे नियम,सिग्नल विषयी माहिती दिली जेणेकरून आपण अपघात टाळू शकतो
तसेच किशोरवयीन मुले विनापरवाना गाडी चालवितात त्यांना पालकांनी शिस्तीने समजावून सांगितले पाहिजे असा विचार काजूवाडी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे ह्यांनी मांडला
आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, बचत गट ,पालवी महिला मंडळ सभासद अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना मोफत हेल्मेट चे वाटप करण्यात आले
त्यावेळी पालवीच्या सभासद सौ दीपा गावंड ह्यांनी सूत्रसंचालन केले व पालवी युथ विंग हेड डॉ साक्षी भारती ह्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व आज ऐकलेली माहिती महिलांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे हे आवाहन देखील केले.
कार्यक्रमास संस्थेच्या ज्योती कदम,रुचिता मुळे, मनीषा कांत,सुशीला ओझा, दक्षा जेठवा ,रुपाली हावले ,रामचंद्र पाटील,अमोल कदम ,सुमित चव्हाण,पोपट गाडे उपस्थित होते.