मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकॅडमितील फलंदाजीचे माजी प्रशिक्षक, एमसीए प्रशिक्षण समितीचे माजी चेअरमन ६४ वर्षीय जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक संजय गजानन गायतोंडे यांची कुर्ला स्पोर्ट्स क्लबतर्फे देण्यात येणाऱ्या १७ व्या जी.एस.वैद्य स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती क्लबचे कार्यवाह दाऊद खान यांनी दिली आहे.
मुंबईसह ठाण्यातील उपनगरात क्रिकेट खेळासाठी भरीव योगदान देणाऱ्या क्रीडा कार्यकर्त्यांचा वैद्य पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
कुर्ला स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने सुरु असलेल्या ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती ढाल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी दुपारी २ ते ५ दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गतवर्षीचा अजिंक्य ठाण्याचा युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन आणि यंदा प्रथमच अंतिम फेरी गाठणारा संजय गायतोंडे यांचा स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब यांच्यात अंतिम लढत होईल.
मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अभय हडप हे या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुर्ला स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ नासिर दवे समारंभाध्यक्ष म्हणून उपस्थित असतील अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रल्हाद नाखवा यांनी दिली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *