कलाविष्कारांचा अनोखा संगम
सिद्धेश शिगवण
ठाणे : संगीत, नृत्य आणि विविध कलाविष्कारांचा अनोखा संगम ११ व्या विहंग कलामहोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील उपवन तलावाशेजारी पहायला मिळाला.
मर्दानी खेळ, गोफ, ढोल ताशांचा गजर, विविध राज्यातील लोकनृत्य आदींनी सजलेल्या यात्रेने संस्कृती आर्ट फेस्टिवलची सुरुवात झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.
विविधतेतून एकता जपणारी आपली भारतीय संस्कृतीचे प्रतीक या फेस्टिवलच्या माध्यमातून अधोरेखित होईल असा विश्वास महोत्सवाचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या सोहळ्याच्या लोकार्पणानंतर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या सुरेल स्वरांनी उपवन तलावाचा परिसर भारावून गेला.
आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या, विविध कलांचा अविष्कार असणाऱ्या या फेस्टिवल ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, कश्मिरा सरनाईक, अनाहिता सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेविका आशा डोंगरे, सिंघनिया हायस्कूल मुख्याधपिका रेवती श्रीनिवासन आदी मान्यवर उपस्थित होते.