कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक

 

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत येथील यार्डमध्ये सुधारणा, कर्जत स्थानकावरील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, १२ जानेवारीला विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवरील पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधली मार्गिकेवर रविवार, १२ जानेवारीला दुपारी १.५० ते ३.३५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत बदलापूर – खोपोली स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली आणि दुपारी १.१९ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येणार आहे. दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येणार आहे.
रविवारी दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत – सीएसएमटी लोकल, दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली – सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३.२६ वाजता कर्जत – सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुटेल. गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस दुपारी २.५० ते ३.३५ दरम्यान चौक येथे थांबवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *