मुंबई : शिवसेना ठाकरे गट तर्फे मुलुंड विधानसभेच्या वतीने माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा झालेल्या ममता दिना निमित्त श्रीमती म. तु. अग्रवाल, श्रीमती श्यामकुवंरबाई जटाशंकर डोसा प्रसूतीगृह, स्वातंत्र्यवीर सावरकर या मनपा रुग्णालयातील रुग्णांना महिला विधानसभा प्रमुख नंदिनीताई सावंत* यांच्या उपस्थितीत फळ वाटप करण्यात आली.यावेळी उपविभाग संघटक श्रीमती हेमलता सुकाळे, सुनीता धोंगडे ग्रा.संरक्षण कक्षप्रमुख प्रकाश सावंत, शाखाप्रमुख शैलेश पवार महिला शाखा संघटक सुजाता इंगवले,माजी शाखाप्रमुख रोहिदास देवाडे युवा सेना समन्वयक संदेश मोढवे,स्वप्नील सुर्यवंशी , रोहित चिकणे, सतीश बंदरकर, स्वप्नील गायकवाड, संगीता पालव, नीता मोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख दिनेश जाधव यांनी केले होते.