शालेय विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे वाटप

ठाणे -वर्तकनगर येथील श्री जानकादेवी मंदिरातील पुजारी कैलासवासी रामदास स्वामी बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी थिराणी विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यास, खेळ, व्यायाम याबाबत माहिती दिली. तसेच चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रार्थना, स्तोत्रपठण ऐकून मुलांचे कौतुक केले. मुलांची शिस्त पाहून सर्व शिक्षकांचे कौतुक केले. थिराणी विद्यामंदिर वर्तकनगर येथील आर. बी. अंकोला प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी मधील 400 ते 450 विद्यार्थी सदर प्रसंगी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर, चिटणीस हरेश घोगळे तसेच संजय परदेशी, उदय आजगावकर, श्री. बागवे, श्री. आरोलकर आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *