कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने

कल्याण :  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड वकील संघटना आणि शहापूर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने के. सी. गांधी हायस्कूलच्या सभागृहात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभ बाबत मातृसंस्था वकील परिषदेचे उपाध्यक्ष सुदीप पासबोला  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. मातृसंस्था वकील परिषदेचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी संविधानाच्या सर्वनामाचे वाचन केले. त्यांच्या मागे उपस्थित सर्वांनी संविधानाचे सरनामाचे एकत्रित रित्या वाचन केले. जायभाये यांनी संविधान निर्मिती बाबत विविध दाखल्यांचा आधार घेत संविधान कसे निर्माण झाले याबाबतचे ओजस्वी भाषेत विवेचन केले.
कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे वक्ते ॲड. गणेश शिरसाट यांनी संविधानाबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती मार्गदर्शन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून ऐतिहासिक असे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या केसचा  रोमहर्षक उलगडा केला असल्याची माहिती कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *