नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयांकडे पाठविण्यात आली. यावेळी विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 11 असून आज आलेल्या अर्जांची संख्या 05आहे, असे एकूण प्राप्त अर्ज 16 होते त्यापैकी 01 अर्ज निकाली काढण्यात आला आहे. त्यापैक 15 अर्ज प्रलंबित आहेत.