कल्याण : ‘ले चली तकदीर’ ही संगीत उद्योगातील तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘क्रेसेंडो कल्लाकारने’ आयोजित केलेली एक संगीत मैफल आहे. ‘क्रेसेंडो कल्लाकार ही पहिलीच निर्मिती असून नुकताच पहिला कार्यक्रम कल्याण मध्ये सादर केला होता. हा डोंबिवली मधील पहिलाच प्रयोग असून हा शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री ८.३० सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे सादर होणार आहे.
या कार्यक्रमात बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट व संगीत विश्वातील उपशास्त्रीय गाण्यांचा समावेश आहे. यातील तरुणाईला भावणारी आणि साद घालणारी गाणी काही रागांवर आधारित आहेत किंवा काही व्यक्त होणाऱ्या गझल आहेत. ‘प्रेमाचे टप्पे’ ही कार्यक्रमाची संकल्पना असून,प्रेमजीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचा उल्लेख केला जाईल आणि परिस्थितीनुसार गाणी सादर केली जातील.
“निवेदन हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. निवेदक आपल्याला एक कथा, काही आठवणी आणि जोडप्याचा प्रवास सांगेल ज्यामुळे कथाकथन आणि गाणी यांचे मिश्रण असणारा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करण्याचा हा प्रयत्न असेल असे क्रेसेंडो कल्लाकार चे मेघ दांडेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात अन्वय भागवत आणि प्रज्ञा गावंड हे तरुण गायक आपली कला सादर करणार असून त्यांना तबला साथ ईशान भट, संवादिनी सारंग जोशी,की बोर्ड प्रथमेश मोहिते, ऑक्टोपॅड प्रसाद भालेराव,गिटार पार्थ मयेकर व सोहम दळवी असे कलाकार सहभाग घेणार आहेत.
या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात काही गाण्यांसोबत युक्ता जोशी आपल्या कथक नृत्यातून गाण्यातील भाव भावना सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवेदनाची महत्वाची बाजू मयुरेश साने सांभाळतील. डोंबिवली मधील पहिल्याच प्रयत्नाला रसिक नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील याची खात्री आहे असे आयोजक मेघ दांडेकर व ईशान भट यांनी सांगितले. संपर्क मेघ दांडेकर 9920923833; ईशान भट 9819092022