अनिल ठाणेकर
ठाणे : भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत ९०० हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहोर उमटवली.
भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजपा सदस्यता अभियान सुरू करण्यात आले होते. तर महाराष्ट्रात ५ जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविले जात आहे. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील १२ मंडलात परिणामकारक पद्धतीने सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जात आहे. प्रत्येक बूथवर किमान २५० सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
भाजपा सदस्यत्व अभियानांतर्गत आज रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबरच युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबविले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ९०० हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरुन ऑनलाईन नोंदणी केली. या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सरचिटणीस मनोहर सुगदरे, उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरज दळवी, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वकर्मा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस रक्षा यादव, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील, मुंब्रा मंडल अध्यक्षा कोमल जितेकर, उपाध्यक्ष मनाली कोहोपरे, सुषमा लोके, राधा मठकर, विशाखा पवार, भाग्यश्री मुळे, सई कारुळकर आदी सहभागी झाले होते.
०००००
