मुंबई : गाथा सप्तशतिपासून आजपर्यंत बदलत गेलेली भाषेची रुपे ही गाणे व अभिवाचन यातून उलगडून दाखवणारा डॉ. `इथे मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २६ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी १० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, बांधणी व सहभाग डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचा आहे. गिरीश दातार व गौरी देशपांडे यावेळी अभिवाचन करतील तर नेहा देशपांडे व समीहन सहस्त्रबुद्धे गायन करतील. तसेच या दिवशी वार्षिक पारितोषिक वितरणदेखील होणार आहे, अशी माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.
००००