नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आदेश वाघमारे, घर क्र. 404, सेक्टर-20, बेलापूर गांव, 2) महेश मोतीराम कुंभार, घर क्र.706 सेक्टर-19, शहाबाज गांव, बेलापूर 3) प्रशांत जोशी, घर क्र. 594,सेक्टर-20, बेलापूर, 4) नान्हे अब्दुल अन्सारी, घर क्र.0574, सेक्टर-19/बी, फणसपाडा बेलापूर 5) मधुकर चंदर म्हात्रे व इतर, भु.क्र.बी-335 व बी-336, सेक्टर-20, बेलापूर, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामास ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत.
तसेच त्याअनुषंगाने संबधितांनी वरील, केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन बेलापूर येथील MRTP कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या 05 अनधिकृत बांधकामांवर नमुंमपा व सिडको कडील अधिकारी/ कर्मचारी यांचे संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या धडक मोहिमेसाठी डॉ. अमोल पालवे, सहआयुक्त तथा विभाग अधिकारी- बेलापूर, यांचे नियंत्रणाखाली तसेच आत्माराम काळे, कनिष्ठ अभियंता व रमेश राठोड,प्रशासकीय अधिकारी यांचे उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाई करीता उपस्थित होते. ए विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, मजूर-15, मुकादम-01, जेसेबी-01, हॅमर – 02 व गॅसकटर – 01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.