नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ मधील सुयोग समूह परिवार यांच्या वतीने ” ध्यास समाज प्रबोधनाचा ” या संकल्पनेतून मागील तीन वर्षापासून व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. त्यानुसार यावर्षी ठाणे विद्यालयाच्या शिक्षिका व्याख्यात्या साधना जोशी यांनी ” गोष्टी तुमच्या आमच्या ” या विषयावर १३ जानेवारी २०२५ रोजी “मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास” चांगल्या प्रकारे सांगून, जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी या व्याख्यानातून सर्व सुयोग आणि सानपाडाकराना दिला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
ज्यांचे सहकार्य आपल्याला लाभतं, त्यांना आपण थँक्यू किंवा धन्यवाद बोलणे. न पटणाऱ्या गोष्टी सोडून जागेवर सोडून देणे आणि सदैव सकारात्मक विचार घरामध्ये आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंगीकारने. अशा सर्व गोष्टींनी व्याख्यानातून त्यांनी लोकांशी चांगला संवाद साधून व्याख्यान सादर केलं.आलेल्या सर्व नागरिकांनी सुयोग परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, उपशहर प्रमुख सुनील गव्हाणे, अजित सावंत, अविनाश जाधव, जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, अप्पा आणि सहकारी, गार्डन ग्रुप ७:५० अध्यक्ष सदाशिव तावडे आणि सर्व सहकारी व सानपाडा नागरिक यांनी उपस्थित दाखवली. संस्थेचे सदस्य व सुयोग समूह परिवार व्याख्यानाचे आयोजक आणि शिवसेना विभाग प्रमुख अजय पवार यांनी सुंदर निवेदन केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष कैलास ताजने, व्याख्यात्या.साधना जोशी, खजिनदार जितेंद्र विचारे, उपाध्यक्ष सचिन शिंदे आणि राजबा गावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शुभारंभ करून करण्यात आला.
00000