रमेश औताडे

मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आग्नेय आफ्रिकेतील एक देश मोझाम्बिकहुन आलेल्या ४० वर्षे वयाच्या महिलेच्या मूत्र असंयम (लघवी लीक) आजारावर अपोलो हॉस्पिटल ने यशस्वी उपचार केले .

श्रीमती ऍलिस यांना बऱ्याच वर्षांपासून मूत्र असंयमाचा त्रास  होता. या विकाराचा खूप मोठा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला होता, खोकणे किंवा शिंकणे यासारख्या सामान्य क्रिया देखील खूप आव्हानात्मक बनल्या होत्या. मूत्र असंयम ही एक सर्रास आढळून येणारी समस्या आहे पण तरीही गैरसमजुती, सामाजिक कलंक आणि त्यावरील उपचारांविषयी जागरूकतेचा अभाव त्यामुळे बहुतांश वेळा ही समस्या दुर्लक्षिली जाते.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने महिलांना आवाहन केले आहे की, असे त्रास होत असतील तर गप्प राहू नका, पुढे या, बोला आणि टीओटी सर्जरीसारख्या मिनिमली इन्व्हेसिव पर्यायांची माहिती करून घ्या. हे उपचार तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देऊ शकतात.

डॉ हिमानी शर्मा, सिनियर कन्सल्टन्ट-ऑब्स्टट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी उपचार करण्याचे महत्त्व समजावून सांगताना त्या म्हणाल्या,”मूत्र असंयम ही फक्त एक वैद्यकीय स्थिती नाही तर हे एक आव्हान आहे, महिलेच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर याचा प्रभाव पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *