मुलींच्या महाराष्ट्राला गटात सर्वसाधारण विजेतेपद
रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला ६० किमी अंतराच्या रोड मास स्टार्ट प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने ८ गुण घेत मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उप पथक प्रमुख उदय डोंगरे यांनी सायंकलिंग स्पर्धे दरम्यान भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले.
महाराष्ट्राच्या पूजा दानोले हिने ६० किमी रोड रेस प्रकारात १ ता. ४५ मी १०.५९० से.वेळ देत रौप्य पदक मिळवले तर गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिने १ ता. ४५ मी १०.५१२ से. वेळ देत सुवर्णपदक पटावले. आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू स्वास्ती सिंग हिने १ ता. ४५ मी १०.७६९से. कांस्यपदक मिळवले.
या सर्धेचे समुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद ८ गुणांसह महाराष्ट्राने पटकावले तर ५ गुणांसह गुजरात दुस-या तर राजस्थान ३ गुणांसह तिसरा स्थानी राहीले.