वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात श्रावणी कटके हिला कांस्यपदक

डेहराडून :  पुण्याच्या श्रावणी कटके हिने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात कांस्यपदक जिंकले. ताईचीक्वॉन हा वुशूचा एक महत्त्वपूर्ण प्रकार असून, त्यात शारीरिक संतुलन, लवचिकता आणि मानसिक एकाग्रतेची आवश्यकता असते.
श्रावणीने यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि वुशू खेळात अधिक सहभाग वाढेल, अशी आशा श्रावणीने व्यक्त केली आहे.
श्रावणी कटके हिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर व पथक प्रमुख  संजय शेटे, खजिनदार धनंजय भोसले, ऑल महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष एस एस झेंडे, सचिव सोपान कटके आणि प्रशिक्षक स्वयम् कटके, प्रतीक्षा शिंदे, गणेश यादव, दीपक माळी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *