ठाणे : विविध प्रकारचे महोत्सव भरविणारे महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठान या संघातर्फे ठाण्यात महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती दर्शवणारा महोत्सव गावदेवी मैदान, ठाणे (प.) येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान भरवण्यात येणार आहे.
यात महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीचे स्टॉल असणार आहेत. त्यात प्रामुख्याने आगरी कोळी पद्धतीचे हाँटेल, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मालवणी पदार्थ, बीड परभणीची तयार खाद्यपदार्थ, मिसळ, बिर्याणी, भजी, ज्युस, सरबते, गोळा यांचा सामावेश असणार आहे. या खाद्यजत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोपटी आणि हुरडा यांचा देखील स्टॉल असणार आहे.
