कल्याण : छत्रपती शिक्षण मंडळ आयोजित अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी नूतन विद्यालय, कर्णिक रोड,कल्याण येथे नुकतीच संपन्न झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती, जिल्हादायित्व विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा महाराष्ट्र संयोजक सुभाष पाटील, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष ना. के फडके, कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे , चिटणीस गागरे, वेदपाठक संस्था सदस्य मिलिंद कुलकर्णी संस्थेतील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 21 शाळांनी सहभाग घेऊन 42 प्रकल्प व 103 विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून नरेंद्र गोळे, सुमन नायर, मोमीन सादिया अंजुम जावेद अहमद, गोपा घोष यांनी परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी प्रयोगाची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली होती. इ. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक गटांमध्ये तीन क्रमांक काढण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता कानेटकर यांनी केले. संस्थेच्या एनईपी समन्वयक उर्मिला जाधव तसेच उपप्रमुख जाहिरा तडवी यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. आभार प्रदर्शन संजय मंजुळे यांनी केले. सुंदर फलक लेखन श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून साकारले असल्याची माहिती शुभांगी भोसले यांनी दिली.