अजित पवार संत नाहीत; पार्थवर गुन्हा दाखल करा

अंजली दमानिया आक्रमक

 पार्थवर गुन्हा दाखल न झाल्यास पुण्यात धडकणार

 मुंबई : गुन्हा दाखल करण्यासाठीचे सर्व पुरावे पोलिसांना देऊनही पार्थवर गुन्हा दाखल होत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही संत नाहीत. हा गुन्हा घडत असताना त्यांना सगळी कल्पना होती. पार्थवर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पुण्यात धडकू असे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारही सहभागी झाले होते.

यापूर्वी आम्ही पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते. पार्थ पवारांनी तेव्हा सांगितलं की ते माझ्या सहीचे पत्र नाही. २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार करून दिला आहे. ही सर्व कागदपत्र सरकार दरबारी आहेत. गेल्या सहा वर्षापासून हा घोटाळा सुरू आहे. एकच नोटरी वकिलाकडून हे बनवून घेतलंय. अजित पवारांना हे सर्व माहीत होतं आणि राज्यातले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात पार्थला वाचवत असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाहीअसा आरोपही त्यांनी केलाय. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एकत्र पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *