

राज्यात नगरपरिषद आणि पंचायतीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर उभारणीत महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या पद्मभूषण साध्वी ऋतंभरा यांचे मुंबईतील वर्षा निवासस्थानी यथोचित स्वागत करून त्यांचा सन्मान केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील अंधेरी येथे बागेश्वर धामचे श्री धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या श्री हनुमंत कथा कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांचे दर्शन घेतले.
