युतीची आज अधिकृत घोषणा होणार
जागा वाटपाचा तिढा सुटला
मुंबईत शरद पवारांसोबत युतीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात
काँग्रेससोबत युती नाही
स्वाती घोसाळकर
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन दिग्गज नेते ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वासाठी उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता जोरदार शक्तीप्रदर्शन करीत युतीची घोषणा करणार आहे. मुंबईसह इतर नगरपालिकेतही युतीबाबत उद्याच घोषणा होणार आहे. अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण उद्या सगळेजण अनुभवतील अशा शब्दात संजय राऊत यांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत आज भाष्य केले.या
यासाठी मंगळवारी दिवसभर बैठकांचं जोरदार सत्र सुरू होतं. संजय राऊतांपासून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई ही मंडळी मातोश्री आणि शिवतीर्थादरम्यान धावपळ करत होते.
शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हटलं. त्यानुसार, आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा उद्याचा बुधवार दिनांक २४ मार्चरोजीचा १२ वाजताचा मुहूर्त सांगितला आहे.
काँग्रेससोबत मुंबईत युतीनसली तर मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर महायुतीम्हणून एकत्र लढू असेही संजय राऊत म्हणाले. तसेच पुण्यात जर अजित पवारांसोतब शरद पवार लढत असतील तर आम्ही पुण्यात काँग्रेससोबत स्वतंत्र लढू असेही ते म्हणाले.
