पोलिसांनाही संवेदनशील मन असतं, कविता लिहिणं सोपं नाही – ज्येष्ठ कविवर्य अशोक बागवे
ठाणे : वयाच्या पन्नाशीनंतर व्यंकट पाटील यांना सृजन कळा होऊन कविता स्फूरू लागल्या, आणि पोलिसातही संवेदनशील मन असते हे त्यांनी दाखवून दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी पुस्तकं प्रकाशनवेळी केलं. निवृत्त पोलीस अधिकारी व्यंकट पाटील यांच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा काल काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे पार पडला.
व्यंकट पाटील यांची सगळी पुस्तकं हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादीत होऊन राष्ट्रीय पातळीवर जावीत अशी इच्छा डाँ नरेंद्र पाठक यांनी यावेळी व्यक्त केली. पोलिसात असूनही संवेदनशील मनाने लेखन केल्याबद्दल साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी कादंबरीतील निवडक भागाचे वाचन सिने कलावंत अभय पैर यांनी केले तसेच कवी राहुल सोळंपूरकर यांनी पाटील यांच्या लेखानाचे कौतुक केले. संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकांच्या सोहळ्यास पोलीस अधिकारी तसेच रसिकांनी भरपूर गर्दी केली होती.
