आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांनी सुरू केले बेमुदत उपोषण
कल्याण : राज्य सरकारने १५ दिवसांपासून आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाले होते तरीही एका आजारी माणसाला शासनाच्या नाकर्तेपणामुळे न्याय मिळत नसल्याकारणाने जीव धोक्यात टाकून आंदोलनाचा पवित्रा घ्यावे लागत आहे.
नागपूर च्या हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना करण्यात यावी, परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे साळवे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
