दिवा- ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून प्रचाराचा वेग चांगलाच वाढला आहे. दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ (ड) मध्ये बळीराज सेनेने प्रवीण उतेकर यांना उमेदवारी देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. या निर्णयामुळे या प्रभागात बळीराज सेनेची मोठी राजकीय दहशत निर्माण झाली आहे.
रविवारी ११ रोजी बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी दिवा येथे जाहीर मेळावा झाल्याने बळीराज सैनिकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. राजकीय सर्व्हेनुसार या प्रभागातील खरी लढत बळीराज सेनेभोवतीच फिरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. दिवा शहरात राज्यातील विविध भागांतून नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण विभाग, विद्युत व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच पावसाळ्यात साचणारा चिखल या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये आता बदलाची तीव्र इच्छा असून बळीराज सेना हा एक नवा आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे.
प्रवीण उतेकर यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांच्या कार्यप्रेरणेने त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह बळीराज सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक २८ (ड) मधून उमेदवारी दिली. दरम्यान, दिवा शहरात बळीराज सेनेने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक रणांगणात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
s
