जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला.

पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले.

चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता.

सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *