Month: March 2026

कल्याणमधिल भूमाफियांविरूध्द ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २७ गावातील द्वारली येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या तीन भूमाफियांच्या विरूध्द आय प्रभागाच्या अधीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्याने (एमआरटीपी) कलमाने तक्रार केली आहे.…

विदर्भाचे ज्येष्ठ नेते  दत्ता मेघे यांचे निधन

  नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सुमारे चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून…

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस

मुंबई : राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याची…

रेल्वेच्या खांबावर चढून अज्ञात युवकाचा धिंगाणा

 करंट लागून खाली पडला ० रेल्वेसेवा विस्कळीत कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून धिंगाणा घातल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच…

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांची थर्ड डिग्री

दिवसा तारे आठवले ० शक्ती गेल्याचा आलाप ० चेहरा लपवला नाशिक : भोंदूगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन उर्फ अशोक खरातला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली. अटकेनंतरही तोऱ्यात चालणाऱ्या अशोक खरातला स्वताच्या पायावरही…

नाबाद८९३१ दिवस !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनातील नवा विक्रम स्थापित केला आहे. तब्बल सलग ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी…

आसाममध्ये भाजपाचा प्रवास ५ जागांपासून ७५ पर्यंतचा  भाग पहिला

राजू रावल पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होताच देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली…

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय रत्नागिरी : (अशोक गायकवाड )–जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता १ कोटी ९८ लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे चहापानाची आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभिनेत्री भूमी पेडणेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे चहापानाची आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभिनेत्री भूमी पेडणेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.