Month: March 2026

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी स्लग – केंद्र सरकारकडून गॅससाठी एस्मा कायदा लागू गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आधी घरगुती गॅसला प्राधान्य मग औद्योगिक वापरासाठी होणार…

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी कल्याण: पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे आणि मुलीच्या करिअरला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.   कल्याण (प.) येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या सयुक्त विद्यमाने ‘अहिल्या-जागर-स्त्री शक्तिचा’ या उक्तीनुसार आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महिलांचे योगदान सेलिब्रेट करण्यासाठी हा कार्यक्रम करित आहेात ,सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महापालिका देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची सुरवात सुमधुर उडत्या गाण्यांनी झाली. या सुरावटींवर तरुणाईने ठेका धरल्याने सर्व वातावरण या सुरांनी भारुन गेले. या कार्यक्रमात ‘स्टोरी ऑफ चेंज’ या आशयाखाली आज तक वृत्तवाहिनीच्या अनुजा धाक्रस, MD Miss India २०२० गजनंदीनी, ठाण्यातील पहिल्या स्टेशन मॅनेजर अपर्णा देवधर, पॉवर लिफटींग मध्ये गोल्ड मेडेल्स मिळवलेल्या गिरिजेश कुमारी, ठाणे जिल्ह्यातील नॅशनल कुस्ती पटू माधवी कुरले या महिलांचा सत्कार महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या या महिलांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना यशाचा अथक श्रमाने पाठपुरावा करणे बाबत संदेश दिला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या आठ महिलांचा देखील सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे बचत गटातील स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक केलेल्या महिलांचा तसेच दामिनी पथकातील पोलिस मार्शलचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आणि बचत गटांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदानाचे वितरणही या वेळी करण्यात आले. यावेळी  करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालिका सदस्य रेश्मा निचळ, शितल मंडारी, अनघा देवळेकर, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद २०२६’ चे आयोजन

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडत आहे. पत्रकारिता, कथाकथन आणि चित्रपट निर्मिती यामध्ये एआय च्या वाढत्या वापराचा वेध…

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह 

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह कल्याण: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेली “साडी वॉकाथॉन” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत आरोग्य, एकता आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या वॉकाथॉनचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विजया पोटे, ज्योती पाटील, गणेश जाधव, शालिनी वायले आणि डॉ. तनुजा वायले यांचा सत्कार करण्यात आला. या वॉकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी साडी परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध गटांमधील सहभागी महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागींचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा दिप्ती दिवडकर, सचिव ॲड. सुषमा पटेल, माजी अध्यक्षा साची कदम, ॲड. नीता कदम, ॲड. अर्चना सबनीस, सविता जरपडे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. साडी परिधान करून चालण्याच्या या अनोख्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासोबतच भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत. ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत यांनी महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद यांनी पुरुषांत तिसरी फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात आज पासून सुरु झालेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत किल्ले माऊली संघाने राहुल मंडळावर ५५-१८ अशी सहज मात केली. सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९-११ असे वर्चस्व राखले. उत्तरार्धात आणखी २ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, मयुरी शेलार, संजना विशे यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नव तरुण मंडळाने मध्यंतरातील ०८-१३ अशा पीछाडीवरून शिवतेज संघाला २५-२४ असे चकवीत आगेकूच केली. वैभवी कासार, रिबीका गावीत यांनी आक्रमक खेळ करीत शिवतेजला विश्रांतीला आघाडी दिली होती. पण विश्रांतीनंतर नव तरुण संघाच्या संयमी यादव, भाविका यांनी तुफानी खेळ करीत संघाला तिसरी फेरी गाठवून दिली. महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारतने स्व. राकेशदादा म्हात्रे संघाचा ४५-२० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळाचा ३९-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपती शिवाजीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वेदान्त नायक, ओमकार मोरे, तन्मय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नवरत्नचा देवराज बने बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंदने राज मंडळाचा प्रतिकार २८-१२ असा संपविला. पहिल्या डावात १४-०४ अशी विवेकानंद संघाकडे आघाडी होती. यश पाटील, कुणाल पानसरे या विजयात चमकले. या स्पर्धेचे उदघाटन ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद

एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद ठाणे – ऍडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांच्या स्मरणार्थ ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे सुर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकावला.  स्पर्धेत ठाणे थंडर्स, एनबीईई स्पोर्ट्स क्लब, ठाणे रोटरी टायटन्स, पीडब्लूडी, आम्ही मुलुंडकर, गरवारे क्लब, मिड सिटी सीसी डोंबिवली आणि रारा मास्टर्स असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला. आयपीएल, रणजी, प्रथम श्रेणीतील खेळाडूंचा संघात समावेश होता. प्रवीण तांबे, संदीप दहाड, अमित दाणी, रॉबिन मॉरिस, अमित पागनीस, अमित वेलस्कर, मनोज जोगळेकर, आशिष महाडेश्वर, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन व इतर दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. एनबीईई स्पोर्ट्स क्लबने विजेते पदाचा खिताब पटकाविला. तर ठाणे थंडर्स उपविजेता ठरला. तर दुसरा उपविजेता संघ गरवारे क्लब ठरला. सामनावीर म्हणून ओजस मेहता, उत्कृष्ट फलंदाज देवा मोरे, उत्कृष्ट गोलंदाज योगेश डिचोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओजस मेहता, उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  विजेतेपदाची ट्रॉफी उषा मधुकर चांदुरकर यांनी मधुकर रामचंद्र चंद्रुकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली. उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून महान व्यक्ती अश्विन वसवडा, केंद्रीय मंत्रालय उपसचिव श्री किमबहुने, आदेश चांदुरकर, किरण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समता ओवळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा चांदूरकर, लीना जाधव, सविता साळुंखे, शुभांगी भोर, शैला सिंह यांचा सत्कार करण्यात आला. सामनाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी केले.

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील- फडणवीस

ठाणे: जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी…

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी ९ लाख मुलींचे होणार लसीकरण

रमेश औताडे मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या…