आरती परब
डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेबाबत सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेत मतदारांना नोंदणीसाठी आवश्यक मदत व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेत याबाबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण- डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
