महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत
मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव केला .
दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६ गुणांनी आरामात पराभव केला. तर
भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला.
प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला.
०००००००
