जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने ४५ वर्षांवरील पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत वर्तकचा सामना विक्रात करणकरशी होईल. अव्वल मानांकित सचिन भारतीचा सामना धीरेंद्र मौर्याशी होईल. ४५ वर्षांवरील महिला एकेरी गटात, अव्वल मानांकित प्रिया आंबेकर आणि दुसऱ्या मानांकित नमिता मेहता-विजयकर यांनी सहज विजय मिळवला. अजिता रविंद्रनने चुरशीची झुंज देत नमितासोबत उपांत्य फेरीतील सामना निश्चित केला. प्रियाचा सामना पूजा झलानीशी होईल. ४५ वर्षावरील पुरुष दुहेरी गटामध्ये, अव्वल मानांकित गौतम लाड/शैलेश डागा जोडीने दुसऱ्या मानांकित बालकिष्णा/राजेश डी सूझावर, विजय मिळवून रोमांचक उपांत्य फेरी गाठली.
निकाल (उपांत्यपूर्व फेरी): महिला एकेरी ४५+ – प्रिया आंबेकर [१] बीटी अंजली परब १५-५, १५-७; पूजा झलानी bt साफिया अंजुम फारुकी १५-६, १५-६; अजिता रवींद्रन bt सोनल बट्टाड १५-१०, ७-१५, १५-१३; नमिता मेहता-विजयकर [२] बीटी रश्मी लादिया बिश्त १५-७, १५-७.
उपांत्य फेरी प्रिया आंबेकर [१] वि/एस पूजा झालानी; नमिता मेहता-विजयकर [२] V/S अजिता रवींद्रन.
पुरुष एकेरी ४५+: सचिन भारती [१] बीटी सुचित खोबरेकर १५-७, १५-७; धीरेंद्र मौर्य bt जस्टिन जोसेफ १५-८, १५-१०; विक्रांत करंजकर बीटी मुरली सुब्रमण्यम १५-११, १५-७; कौशिक वर्तक बीटी राजन सामंत [२] १०-१५, १५-६, १५-१२.
सेमीफायनल ड्रॉ: सचिन भारती [१] व्ही/एस धीरेंद्र मौर्य; विक्रांत करंजकर V/S कौशिक वर्तक.
पुरुष दुहेरी ११०+: गौतम लाड आणि शैलेश डागा [१] बीटी पार्थसारथी पटनायक आणि राजीव पारेख १५-९, १५-६; अनिस बदामी आणि विपूल पटेल बीटी आशिष हिलेकर आणि मिलिंद घरत ११-१५, १५-८, १५-६; बिभाष चॅटर्जी आणि शिव ठाकूर बीटी अजय हिंदुजा आणि मानेक दारूवाला १५-८, १०-१५, १५-४; बालकिष्णा आणि राजेश डी सुझा [२] बीटी बिमल सिंग आणि नवल बीर कुमार १५-१२, १५-९.
सेमीफायनल ड्रॉ: गौतम लाड/शैलेश डागा [१] वि/एस अनिस बदामी/शिव ठाकूर; बालकिष्ण/राजेश डीसूझा [२] व्ही/एस विपूल पटेल/बिभाष चॅटर्जी
मिश्र दुहेरी ८०+: शैलेश डागा आणि अपर्णा पोपट [१] bt वरदा दीक्षित आणि मितेश अरोरा १५-११, १३-१५, १५-११; शिव ठाकूर आणि नाहीद दिवेचा [२] बीटी कौशिक वर्तक आणि सरला कोटक १५-१०, १५-१३; मोहन आणि तेजस्वी सावंत देसाई bt विक्रांत करंजकर आणि प्रिया आंबेकर १५-११, १५-६; हेमंत दुग्गल आणि श्वेता ठाकूर बीटी राजन सामंत आणि सेजल शेठ १५-१३, १५-४.
सेमीफायनल ड्रॉ: शैलेश डागा/अपर्णा पोपट [१] वि/से संदीप मोहन/तेजस्वी सावंत देसाई; शिव ठाकूर/नाहीद दिवेचा [२] व्ही/एस हेमंत दुग्गल/श्वेता ठाकूर
०००००००००
