कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते. मात्र पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय ठरला होता. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०६ वर्षांपूर्वी ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र सुरू केले. मूक समाजाचा आवाज बनलेल्या या क्रांतीला या देखाव्यातून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. मुकनायक म्हणजे केवळ एक वर्तमानपत्र नव्हे, तर तो गुलामीच्या अंधाराविरुद्ध पुकारलेला पहिला मोठा लढा होता. हा देखावा याठिकाणी पत्रकार अशोक कांबळे  यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याची सजावट कैलास कांबळे, नदीम अन्सारी, स्नेह वर्धक मित्र मंडळाने केली आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *