कल्याण : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी इको गाडीचा अपघात होऊन ११ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर आरटीओ आणि वाहतूक पोलीस खडबडून जागे झाले असून आज दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक पोलिसांनी प्रवासी वाहनांची कडक तपासणी करत  कारवाई केली. बुधवारी सकाळ पासून कल्याण वाहतूक शाखे मार्फत  वाहनावर  कारवाईचा बडगा उगरला असून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली.
आज हॉटेल महालक्ष्मी कल्याण स्टेशन परिसर येथे मुरबाड येथील अपघाताच्या अनुषंगाने परमिटचे उल्लंघन करुन अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये दोन काळी पिवळी टँक्सीवर ६६/ १९२ अ-अन्वये कारवाईचा बडगा उगरित १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी संपर्क साधला असता सांगितले, तसेच कारवाईचा बडगा असाच  सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *