तरुण खेळाडूंना आधुनिक सुविधांचा लाभ

मिरा भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील भाईंदर ( प )येथील प.पु.ग. जैनाचार्य श्री विजय अभयदेव सूरिश्वरजी म.सा. महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नरेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. वास्तूमुळे भाईंदर पश्चिमेकेतील क्रीडाप्रेमींना नक्कीच फायदा होईल. या वास्तूची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे असे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले.
मिरा भाईंदर शहरात या अगोदर शहरातील क्रीडा प्रेमी खेळाडू यांच्या करता फक्त एकच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होते. मात्र शहरातील क्रीडा प्रेमी यांना प्रोत्साहन देण्याकरता पालिकेच्या मार्फत भाईंदर पश्चिम येथे एक क्रीडा संकुल इमारत बांधण्याचा निर्णय २०१८ साली घेण्यात आला. २०१९ साली प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींसाठी आजपासून सुरु झाले आहे. भाईंदर पश्चिम येथे तयार करण्यात आलेल्या प.पु.ग.जैनाचार्य विजय अभयदेव सुरीश्वरजी म.सा. क्रीडा संकुल वं सभागृह इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३४८२.५० चौ.मी.इतके आहे. मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पश्चिमेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगत असलेल्या अग्निशमन केंद्र इमारतीच्या जागेत कम्युनिटी हॉल, क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे.
याचा अंदाजित खर्च ४२ कोटी १२ लाख २ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये स्टील पार्किंग सह चार मजल्याचे आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर एक सभागृह, दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, कॅरम, टेबल टेनिस, जिम,स्टोररूम व तिसऱ्या मजल्यावर स्क्वॉश कोर्ट, तायक्वांदो कोर्ट तसेच बॉक्सिंग कोर्टाची सुविधा देण्यात आली असून, चौथ्या मजल्यावर आधुनिक क्रिकेट टर्फ विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीने इमारतीचे स्वरूप आहे.
निमंत्रण पत्रिकेत राज शिष्टाचाराचा भंग
या लोकार्पण सोहळ्याची महानगरपालिकेने निमंत्रण पत्रिका छापली होती. या पत्रिकेत परिवहन मंत्र्यांचे नाव आमदार आणि महापौर यांच्या खाली छापण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी या प्रकाराची तक्रार करणारी पत्र संबंधित यंत्रणाना पाठविली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *