कल्याण : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित रिजन्सी सर्वम क्लब हाऊस,टिटवाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित एक सामाजिक बांधिलकी जपत व त्यांच्या विचारांना कृतीत आणण्यासाठी रक्तदान हेच जीवनदान या उक्तीनुसार रक्तदान शिबिराचे रिजन्सी सर्वम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित अभिवादन केले. रक्तदान शिबीरास मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर ३ व रेड स्वस्तिक सोसायटी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व रेड स्वस्तिक सोसायटी चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *