सर्वांचीच बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित


उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती”पदासाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी उल्हासनगर महापालिका सचिव अनंत जावद्वार यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.  स्थायी समिती सभापती पदासाठी सहोता कलवंत सिंग यांनी अर्ज दाखल केला तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी दुधानी दिप्ती नवीन नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी मिनाकौर अजितसिंग लबाना,
पाणी पुरवठा व जलः निसारण समिती सभापती पदासाठी दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परिक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती पदासाठी  सविता प्रवीण तोरणे, माध्यमिक शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी साक्षी संदिप सुर्वे, गलिच्छ वस्ती व निर्मुलन समिती सभापती पदासाठी विपुल दत्ताराम मयेकर, क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी प्रीती विनोद मखिजा, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी मिना दिपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी प्रेरणा अजित माखिजानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.
त्यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम, उपमापोर अमर लुंड, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश वधारीया, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना गटनेते अरुण आशान, मनोज लासी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यावेळी गोपाळ लांडगे म्हाणाले महापालिकेच्या नियमाप्रमाणे महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती आणि ९ इतर विशेष समित्या यांच्या सभापतीची आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती, सर्वांनी वेळेमध्ये फॉर्म दाखल केले आहेत, शिवसेनेला ५ विशेष समित्या आणि भाजपाला ४ समित्या मिळाल्या आहेत .याप्रमाणे फॉर्म भरण्यात आले आहेत. निश्चितपणे ५ वर्षांमध्ये सर्वांना संधी मिळेल त्यामुळे पहिल्याच वर्षी सगळ्यांना अपेक्षाप्रमाणे संधी मिळालेली नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सर्वांनाच ज्या कमिटी आहेत त्याप्रमाणे सर्वांना संधी मिळणार आहे आणि या महापालिकेचे कामकाज समितीच्या माध्यमातून यापुढे अधिक गतीने निश्चित होईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *