कल्याण :  कल्याण  येथे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या स्वागतार्थ भाजप महिला आघाडीने रॅली काढत जल्लोष साजरा केला. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभेत नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले यानिमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका रेखा चौधरी, सरचिटणीस प्रीती दीक्षित, नगरसेविका मनीषा गायकवाड, स्नेहल मोरे, डॉ. पूजा गायकवाड, भाजपा पदाधिकारी वंदना मोरे आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणपती मंदिर येथून या रॅलीला सुरवात करून सिद्धार्थ नगर, म्हसोबा चौक, तिसगाव नाका मार्गे तिसाई हाऊस येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *