कल्याण: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जय हनुमान तालीम संघ, सापाड कल्याणच्या वतीने बिट्टू ग्रुप सापाड आयोजित कोकण केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पौढ गट (५७ किलो) गटात विनायक भोईर मानेरा, विवेक भंडारी चौधरपाडा, आयुष पाटील गोवे हे विजयी ठरले. या स्पर्धेस लखन म्हात्रे, पंढरीनाथ ढोणे, सुभाष ढोणे, चैनु लोखंडे, सुरेश पाटील, जयवंत भोईर, लाडकू पाटील, तसेच ग्रामस्थ मंडळ सापाड व सर्व पंच, सर्व वस्ताद, इत्यादींच्या उपस्थितीत हि स्पर्धा उत्साहात पार पडली.
