कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी भाजपा कल्याण जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढ सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण ग्रामीण मंडळ कार्यालयात भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ७० तें ८० जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, सभागृह नेते वरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या जिल्हा कार्यकारणी मध्ये १० उपाध्यक्ष, १० सचिव, ४ सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यलय सचिव प्रत्येकी एक यांच्यासह विविध विभागांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.  सर्व स्तरातील कार्यकर्ते प्रत्येक सेल वरील प्रमुख यांना विचारत घेऊन पक्षाची व्याप्ती वाढावी आगामी निवडणुका, समाजकार्य, मेळावे तळागाळातील  लोकांना न्याय मिळण्यासाठी सामान्य कार्यकर्ता पोहचत असतो त्याच धर्तीवर कार्यक्ररिणीची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *