शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाज कल्याणाच्या उद्दिष्टांनी, गायक आणि संगीतकार दिलीप महाशब्दे यांच्या हस्ते मनोप्रभा ट्रस्टची स्थापना पूजा अक्षय तृतीयेला १९ एप्रिल, शिर्डी साईबाबा मंदिर घंटाळी रोड नौपाडा येथे करण्यात आली. या स्थापना पूजेचे पौरोहित्य, वेदमूर्ती हेमंत जी वीरकर आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचे सहकारी गुरुजी संतोषजी कुलकर्णी यांनी केले. मित्र आणि हितचिंतक चंद्रशेखर (आप्पा) महाशब्दे, श्रीनिवास महाशब्दे, मंदिराचे प्रमुख अविनाश मोहिते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता मधुसूदन शुक्ल यावेळी उपस्थित होते
