रमेश औताडे
मुंबई: राजपुत समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णायक भूमिका घेण्यासाठी श्री राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ येथे चिंतन-मंथन शिबीर झाले. महाराज्य प्रदेश अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील, सर्व विभागातील व सर्व तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील राजपुत समुदायतील सर्वांना, समाजाच्या असंख्य दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा तसेच ठोस भूमिका घेण्यासाठी एकत्र येण्याचे विनम्र आवाहन या चिंतन शिबिरातून करण्यात आले. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनीही आरक्षण व इतर महत्वाच्या विषयावर आपली भूमिका चिंतन शिबिरात मांडली.
समाजातील सुशिक्षित बेरोजगार, समाजातील युवांवर वाढते व्यसनाचे संकट, समाजातील व वर्तमान परस्थितीतील आरक्षणाचे राजकारण संपले तरच जाती पातीचे राजकारण संपेल असे महिपालसिंह जी मकराणा यांनी सांगितले. यावेळी श्याम सिंह ठाकूर म्हणाले सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
००००००००
