सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात
सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात अंतर्गत कॅरम स्पर्धा उत्साहात
नवी मुंबई : सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १७ ते २१ मे दरम्यान पुरुष व महिला एकेरी कॅरम स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पुरुष गटात गजानन (गजाभाऊ) लोखंडे तर महिला गटात शालन देशमुख यांनी विजेतेपद पटकावले. विरंगुळा केंद्रातील महिलांची ही पहिलीच कॅरम स्पर्धा ठरली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात गजानन लोखंडे यांनी दिलीप भागवत यांचा पराभव केला. दिलीप भागवत उपविजेते ठरले. उपांत्य फेरीत मधुसूदन जोशी आणि रमेश कोलगे यांना पराभव पत्करावा लागला.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात शालन देशमुख यांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर विमल व्हटकर उपविजेत्या ठरल्या. बक्षीस वितरणावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी खेळाडूंना संघातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आशा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात महिलांच्या अंतर्गत कॅरम स्पर्धेला “सुवर्णक्षण” असे संबोधले. पुरुषांच्या बक्षीस वितरण सोहळ्यास मारुती कदम, बळवंत पाटील, जे. पी. देसाई आणि जगदीश एकावडे उपस्थित होते. स्पर्धांसाठी ट्रॉफी जे. पी. देसाई यांनी पुरस्कृत केल्या, तर रोख रक्कम माजी अध्यक्ष मारुती नाना कदम यांनी दिली. बळवंत पाटील यांनी संघाला कॅरम साहित्य ठेवण्यासाठी कपाट भेट दिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी सीमा बोराडे, राजेश मांडेवाल, संजय शिर्के आणि गजाभाऊ लोखंडे यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन आशा कुलकर्णी, सुभाष बारवाल आणि संजय शिर्के यांनी केले.
000000000
