मुंबई, २४ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लबमध्ये सोमवारपासून खेळल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेसाठी (२०२६) उत्तराखंडचा अंश त्रिपाठी आणि महाराष्ट्राची निरुपमा दुबे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला मुख्य ड्रॉमध्ये अव्वल मानांकन (सीडिंग) देण्यात आले आहे. पुरुष गटात टॉप सीडेड खेळाडूंमध्ये २० वर्षीय अंशनंतर मध्य प्रदेशच्या आदर्श बंदोडा तर महिला गटात निरुपमा हिच्या नंतर तामिळनाडूची पूजा अर्थी आर. आहे.
सहा दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील ५५८ खेळाडू सहभागी झाले असून पुरुष, महिला, मुले आणि मुली अशा विविध १६ प्रकारांमध्ये स्पर्धा होईल. या स्क्वॉश स्पर्धेने प्रस्थापित खेळाडूंसोबतच भारतातील काही उदयोन्मुख स्क्वॉश खेळाडूंची प्रतिभा पाहायला मिळेल, असे आयोजकांना वाटते. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टवर आठवडाभर सामने खेळले जातील.
नामांकन (सीडिंग्स): पुरुष गट: १.अंश त्रिपाठी (उत्तराखंड), २. आदर्श बंदोडा (मध्य प्रदेश), ३/४. मोहित भट्ट (महाराष्ट्र), ३/४. संदेश पीआर (तामिळनाडू).
महिला: १. निरुपमा दुबे (महाराष्ट्र), २. पूजा अर्थी आर. (तामिळनाडू), ३/४. अनिका दुबे (महाराष्ट्र), ३/४. राणी गुप्ता (महाराष्ट्र).
१९ वर्षाखालील मुले: १. रचित शहा (महाराष्ट्र), २. आतिक यादव (महाराष्ट्र), ३/४.. श्राविन जैन (तामिळनाडू), ३/४. दर्शिल परसरामपुरिया (तामिळनाडू).
१९ वर्षाखालील मुली: १. अनन्या नारायणन (तामिळनाडू), २. अनिका दुबे (महाराष्ट्र), ३/४. व्योमिका खंडेलवाल (महाराष्ट्र), ३/४. छवी सरन (राजस्थान).
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *