रमेश औताडे
मुंबई: आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही यांच्या जवळ गेलो तर रोटी बेटीची सोयरिक साधतील का? तसेच रिपब्लिकन ऐक्याचे ग्रहण अजुन सुटले नसताना आमच्या फाटाफुटी मुळे उपवर्गिकरणाच्या चर्चेला बळ मिळत आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती समन्वय अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते.
बागडे यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष भाई महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्माजी बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहर अध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त लेखा अधिकारी म्हाडा चे जयदेव चिंवडे, मातंग मोर्चा चे नेते मनोहर इंगोले, चर्मकार समाजाचे नेते व सुप्रसिद्ध शायर तन्हा नागपुरी, आंरिमो नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण आवळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे, संजय मोटघरे,सुधिर मोटघरे, हंसराज उरकुडे,माजी नगरसेवक अमर बागडे, युवा नेते सुरज ढोणे, पंकज पाटील, गौतम बागडे, सुदर्शन, वाल्मिकी मोर्चा चे नेते सुभाष बढेल, चरणदास गायकवाड,नरेश खन्ना, वैशाली तभाने, संगिता चंद्रिकापुरे, डॉ सुधा जनंबधू,जुलैखा बेगम रुबिना खान,सरिता थुल, अनिता थुल,भागनबाई मेश्राम, सुशिला जनंबादे, जयश्री मसराम यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतुल गंगापूरकर,भोजराज नंदागवळी अमोल बागडे यांनी केले.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *