मुंबई : निवृत्ती धुमाळ यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त कामोठे येथील दत्तूशेठ पाटील आंतरराष्ट्रीय शाळेत अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक, राजकीय, कामगार, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या निवृत्ती धुमाळ यांनी माथाडी कामगार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. भाई मनोहर कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कामगारांच्या न्यायासाठी संघर्ष केला.
या सोहळ्यात विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. तसेच निवृत्ती धुमाळ आणि त्यांना किडनी दान करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. अनिता धुमाळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती विश्वासराव यांनी केले, तर आयोजन विजय, वेदांगी, श्रावणी आणि सौ. अनिता धुमाळ यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *