अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा
मुंबई, २७ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये सानवी तिडकेने चुरशीच्या लढतीत पहिला गेम गमावूनही सुहासिनी मिश्रावर ११-४, ९-११, १३-११, ११-३ असा विजय मिळवला.
अव्वल दोन मानांकितांनी आगेकूच करत अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्यात टॉप सीडेड ईशा शेळकेने समायरा गांधीवर ११-१, ११-३, ११-५ आणि सीरत घुमनने तारिणी पांडेवर ११-१, ११-०, ११-१ अशी मात केली.
निकाल (१६ वर्षांखालील मुली, राऊंड ऑफ १६): १-ईशा शेळके विजयी वि. समायरा गांधी ११-१, ११-३, ११-५; सीरत घुमन विजयी वि. तारिणी पांडे ११-१, ११-०, ११-१; रुही लोढा विजयी वि. अनन्या जयसिंग ११-०, ११-१, ११-३; श्रिया माहेश्वरी विजयी वि. राहिणी छेडा ११-३, ११-७, ११-५; अक्षरा मखिजा विजयी वि. आरोही साठे ११-३, ११-४, ११-१; अरणा राव विजयी वि. प्राची कलिता ११-१, ११-१, ११-४; सानवी तिडके विजयी वि. सुहासिनी मिश्रा ११-४, ९-११, १३-११, ११-३; आध्या ग्रोव्हर विजयी वि. आदिती सिंग ११-२, ११-२, ११-६.
००००००००
