नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींची अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई
मुकुंद रांजाणे
माथेरान : मागील दोन ते तीन वर्षांपासून दस्तुरी ते टपाल पेटी नाक्यापर्यंत जागोजागी अनधिकृतपणे टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विद्रुपीकरण पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात याच टपऱ्यांवर प्लास्टिक टाकण्यात येते त्यामुळे आपण एखाद्या ग्रामीण भागात आलो आहोत की काय असा भास पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस अशाप्रकारे वाढत्या टपऱ्या आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. इथले पर्यावरण त्याचप्रमाणे झाडी नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतात ही बाब ओळखून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी २८ मे  रोजी सायंकाळी स्वतः दस्तुरी येथील ई रिक्षा स्टँडवरील सर्व अनधिकृत टपऱ्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे रिक्षा स्टँड भोवती जो काही टपऱ्याचा गर्हाडा निदर्शनास येत होता तो काहीअंशी का होईना दूर करण्यात आला असूच ई रिक्षा स्टँडने मोकळा श्वास घेतला आहे. बहुतेक टपरी धारक हे परिसरातील असून काही वर्षांपूर्वी इथे स्थानापन्न झालेले आहेत. दस्तुरी पासून ते टपाल पेटीच्या नाक्यापर्यंत सर्वत्र ह्या टपऱ्या वाढत चाललेल्या आहेत. ई रिक्षा स्टँड ते अमन लॉज स्टेशन पर्यंत संपूर्ण रस्ता मोकळा झाल्यास पर्यटकांना, नागरिकांना चालणे सुलभ होऊ शकते. बाजारपेठ मधील मुख्य रस्त्यावरील सुध्दा जी काही हॉटेल धारकांनी विद्रुपीकरण केलेली आहेत ती सुद्धा वेळीच काढून टाकल्यास संपूर्ण भाग सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी नगरपरिषदेला मदत होऊ शकते असे नागरिक बोलत आहेत.
शासकीय अधिकारी वर्ग नियमितपणे दस्तुरी पासून आरामात ई रिक्षांची सुविधा उपभोगून येत असतात.परंतु डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा ही अनधिकृत कामे हटविण्यास दिरंगाई करत होते. केवळ पगारापूरते कामे करणारी काही अधिकारी मंडळींची जबाबदारी असताना देखील बघ्याची भूमिका बजावत होते. अखेरीस स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी ही अनधिकृत कामे दूर केली आहेत.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *