रमेश औताड
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांची सदिच्छा भेट घेऊन विभागातील विविध विकासकामे तसेच नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष युवक सचिनभाऊ लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष गोसोद्दीन शेख आणि तालुका सदस्य जिब्रान शेख यांच्या वतीने रूपाली कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या, विकासकामांची गती आणि महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत के-उत्तर विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी वॉर्ड क्र. ७९ युवक अध्यक्ष नितीन लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
०००००००००
