नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण/अ.बां.नि.वि.) संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली  विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील  चंदन रानकर (विकासक) गावदेवी मंदिरासमोर, कोंबडी चाळ परिसर, नमुंमपा शौचालयाजवळ, घणसोलीगाव, नवी मुंबई. यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेकडुन तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम तोडक मोहिमेसाठी ६ ब्रेकर, ०१ गॅस कटर व १३ कामगार यांच्या सहाय्याने अंशत: निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अतिक्रमण   विभागातील अधिकारी / कर्मचारी,  तसेच नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे  पोलिस पथक तैनात होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *