ठेकेदाराविरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून कामाचे बिल अदा करू नये
स्थायी समिती सदस्यांची  मागणी
कल्याण : कल्याण पूर्वेतील पालिकेच्या नाले सफाई कामाच्या ठेकेदाराने नाले सफाई किती याची कोणतीच माहिती संबंधित विभागाच्या अभियंत्याला न देता उलट दमबाजी केल्याची माहिती उपअभियंताने स्थायी समितीच्या सभागृहात दिल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर प्रश्नी भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी पालिका उप अभियंताला  धमकी देणाऱ्या मुजोर ठेकेदारा विरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून ठेकेदाराला केलेल्या कामाचे बिल  अदा करू नये असे प्रशासनाला स्थायी समितीच्या सभेत आदेशित केले.
पावसाळा तोंडावर आला तरी  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील सर्वच दहा प्रभागातील नाले सफाईच्या कामाचा  आढावा घेण्यासाठी संबंधित  सर्वच वॉर्ड अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्यासाठी  स्थायी समितीच्या सभागृहात बोलावण्यात आले होते. या वेळी सभागृहाला नालेसफाई ची माहिती देताना स्थायी समिती सदस्यांनी  प्रत्येक प्रभागातील नाले सफाईच्या कामाचा पर्दाफाश केला.
डोंबिवली पश्चिमेतील नाले सफाई बाबत स्थायी समिती सदस्य विकास म्हात्रे, यांनी तर डोंबिवली पूर्वे विभागातील नाले सफाई बाबत भाजपाचे मंदार हळबे, विशु पेडणेकर यांनी नाले सफाई च्या कामाची माहिती घेत अर्धवट नाले सफाईच्या पोल  खोल केला. तर कल्याण पूर्वेतील अर्धवट नाले सफाई बाबत स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी नाराजगी व्यक्त करीत प्रशासनाकडे माहिती मागितली असता नाले सफाई संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुरेशी माहिती नसल्याने हतबल झाले  होते.
कल्याण पूर्वेतील नाले च्या सफाईच्या कामाचा ठेकदार जितु आहुजा यांने पालिकेचे उप अभियंता उमेश भट यांना नाले सफाई केलेल्या कामाची कोणतीच  माहिती दिली नसल्याने सात वेळा नोटीसा दिल्याने उलट धमकी दिली. मात्र  भट यांनी धमकिला कोणतीच भिक घातली नसल्याची माहिती  सभागृहाला दिल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. ठेकेदाराच्या मनमानी कारभारा बाबत स्थायी समिती सदस्या मंदार हळबे व  दीपेश म्हात्रे यांनी  चांगलाच समाचार घेत  पालिका अभियंताच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.  मनमानी कारभार व पालिका अभियातला धमकी देणाऱ्या ठेकेदारा विरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची तसेच ठेकेदारांने केलेल्या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपा स्थायी सदस्य मंदार हळबे व दीपेश म्हात्रे यांनी सभागृहात केल्याने स्थायी समिती सभापतीने ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाला आदेशित केले.
००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *