मुकुंद रांजाणे
माथेरान: माथेरान मधील सातत्याने गायब होत असल्यामुळे माथेरान मनसे पक्षाकडून येथील राम चौक येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु कर्जत विभागीय अभियंते चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. माथेरान येथे सातत्याने गायब होत असलेल्या वीजे मुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये वीज वितरण कार्यालयाबाबत त्रिव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच माथेरान नवनिर्माण सेनेचे माथेरान शहर प्रमुख संतोष कदम यांनी वीज वितरणाला सेवा अखंडित करण्याकरिता इशारा दिला होता परंतु या काळात वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने आज त्यांनी माथेरान येथील श्रीराम चौक येथे आमरण उपोषण चालू केले होते परंतु त्यांच्या सर्व मागण्या या माननीय करण्यात आले होते व त्याचे लेखी पत्र अभियंते केंद्रे साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर मात्रांचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हातून ज्यूस घेत त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
